नगर सह्याद्री टीम मनोरंजन सृष्टीमधून धक्कादायक बातमी आली आहे. एका मोठ्या अभिनेत्याचं निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. लोकप्रिय तमिळ अभिनेत...
नगर सह्याद्री टीम
मनोरंजन सृष्टीमधून धक्कादायक बातमी आली आहे. एका मोठ्या अभिनेत्याचं निधन झाल्याची माहिती मिळाली आहे.
लोकप्रिय तमिळ अभिनेते आणि दिग्दर्शक जी मारीमुथू यांचं आज (८ सप्टेंबर) निधन झालं. ते ५८ वयाचे होते. हृदविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं आहे. ‘इथिर नीचल’ या त्यांच्या टेलिव्हिजन शोचे डबिंग करताना ते कोसळले.
त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. मारीमुथू हे रजनीकांत यांच्या ‘जेलर’ आणि ‘रेड सँडल वुड’मध्ये होते. १९९९ मध्ये अजितच्या 'वाली' चित्रपटात सहाय्यक अभिनेते म्हणून त्यांनी करिअरची सुरुवात केली होती.
त्यांनी असई (१९९९) या चित्रपटात दिग्दर्शक वसंत यांना असिस्ट केले, ज्यात अजित, सुवललक्ष्मी आणि प्रकाश राज मुख्य भूमिकेत होते. त्याचबरोबर त्यांनी कन्नम कन्नम (२००८) या चित्रपटातुन दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते.
COMMENTS