चोरट्यांच्या ताब्यातून ६ दुचाकी जप्त श्रीगोंदा / नगर सह्याद्री - दुचाकी चोरी करणे चोरट्यांना चांगलेच भोवले असून पोलिसांनी बेड्या ठोकल्याने ...
चोरट्यांच्या ताब्यातून ६ दुचाकी जप्त
श्रीगोंदा / नगर सह्याद्री -
दुचाकी चोरी करणे चोरट्यांना चांगलेच भोवले असून पोलिसांनी बेड्या ठोकल्याने चोरट्यांना जेलची हवा खावी लागली आहे.
श्रीगोंदा तालुक्यात मोटरसायकल चोरीचे प्रमाण अत्यंत वाढले आहे. त्यातच सोमनाथ दामोदर कवितके रा.खुल्लेश्वर गल्ली काष्टी ता. श्रीगोंदा यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की ,३० व ३१ ऑगस्ट रोजी फिर्यादीचे मावस दाजी निशांत बबनराव काटकर यांचे मालकीची बुलेट मोटरसायकल क्र.९४४४ ही पार्किंग मधून कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संबंधी शिवाय लबाडीचा इरादेणे स्वतःच्या फायद्या करिता चोरून नेली आहे. यावरून श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ७८१/२०२३ वादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता व सदर गुन्ह्याचा तपास चालू होता.
श्रीगोंदा पोलीस यांच्याकडून मोटरसायकल चोरीबाबत तपास चालू असताना दिनांक 8 सप्टेंबर रोजी श्रीगोंदा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की ,चोरीस गेलेली बुलेट अनिल उर्फ सोन्या मोतीराम आल्हाट व त्याचे साथीदाराने चोरली असून ते पारगाव ता. श्रीगोंदा शिवारात येणार आहेत अशी बातमी मिळाल्याने भोसले यांनी नमूद आरोपीस ताब्यात घेणेबाबत गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग व पोलीस अमलदार यांना आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी पारगाव परिसरात सापळा रचला असता अनिल उर्फ सोन्या आल्हाट व त्याचे साथीदार शुभम गोविंद वैरागड रा. घारगाव ता. श्रीगोंदा पारगाव शिवारात संशयित रीत्या फिरताना मिळून आले. त्यांना पोलिसांची चाहूल लागल्याने ते पळून जात असताना पोलिसांनी त्यांच्या सीताफिने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. पोलीस कस्टडी मध्ये केलेल्या चौकशीमध्ये वरील दोघांनी संगणमत करून ५,७०,०००/- रुपये किमतीच्या सहा मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली. त्यापैकी २,००,०००/- रुपये किमतीच्या ३ मोटरसायकल आरोपींकडून हस्तगत करण्यात आल्या. उर्वरित ३,७०,०००/- रुपये किंमतीच्या ३ मोटरसायकल त्यांनी गणेश विनायक शेलार नवीन गार, ता. दौंड जि. पुणे यास विक्री केल्याचे सांगितल्याने त्याच गुन्हेचे तपास कामी ताब्यात घेऊन त्याच गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून वरील प्रमाणे तीन मोटरसायकल गुन्ह्याच्या तपास कामी जप्त करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्यात आज पर्यंत केलेले तपासामध्ये एकूण ५,७०,०००/- रुपये किमतीच्या ६ मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्यावर अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा पुणे जिल्ह्यात लोणीकंद, पुणे शहर या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. अशा प्रकारचे अजून कोठे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का याचा पोलीस शोध घेत आहेत.
सदरची कारवाई अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे , उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, समीर अभंग ,गोकुळ इंगवले, गुलाब मोरे, मनोज साखरे, प्रताप देवकाते तसेच मोबाईल सेलचे राहुल गुंड , नितीन शिंदे व सेवानिवृत्त अंकुश ढवळे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास गोकुळ इंगवले हे करीत आहेत.
COMMENTS