आमदार नीलेश लंके यांची माहिती पारनेर | नगर सह्याद्री पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील ११ कामांसाठी ९ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला अ...
आमदार नीलेश लंके यांची माहिती
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील ११ कामांसाठी ९ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली आहे. पर्यटन खात्याच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला आहे. पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार. नीलेश लंके यांच्या विशेष प्रयत्नातून पर्यटन विभागांतर्गत पारनेर-नगर मतदार संघातील खालील गावातील विविध विकास कामासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे.
यामध्ये प्रामुख्याने अकोळनेर येथे खंडोबा देवस्थान परिसर बहुउद्देशीय हॉल बांधकाम करणे-९९ लक्ष, अरणगाव येथे बुवाजी बुवा देवस्थान परिसर बहुउद्देशीय हॉल बांधकाम करणे-१०० लक्ष, घोसपुरी येथे पद्मावती देवस्थान परिसर बहुउद्देशीय हॉल बांधकाम करणे-५० लक्ष, करंदी येथे मळगंगा देवस्थान परिसर बहुउद्देशीय हॉल बांधकाम करणे-७५ लक्ष, वडगाव दर्या येथे दर्याबाई वेल्हाबाई देवस्थान परिसर बहुउद्देशीय हॉल बांधकाम करणे-५० लक्ष, सावरगाव येथे हनुमान मंदिर देवस्थान परिसर बहुउद्देशीय हॉल बांधकाम करणे-५० लक्ष, भाळवणी येथे नागेश्वर देवस्थान परिसर बहुउद्देशीय हॉल बांधकाम करणे-७५ लक्ष, निघोज येथे एन एच-६१ रोड ते कुंड रस्ता काँक्रीट करणे-६५ लक्ष, निघोज येथे मळगंगा देवी परिसर सुशोभीकरण करणे-५५ लक्ष, निघोज येथे मळगंगा देवी परिसर पर्यटन विसावा केंद्र बांधकाम करणे-२५० लक्ष, निघोज येथे मळगंगा देवी परिसर पर्यटन भोजन कक्ष बांधकाम करणे-१३० लक्ष या कामांचा समावेश असुन या कामासाठी ९ कोटी ९९ लक्ष रुपयांचा निधी दिला आहे.
आमदार नीलेश लंके यांनी वरील गावातील विविध विकास कामासाठी भरगोस निधी मंजूर करून दिल्याबद्दल अकोळनेर, अरणगाव घोसपुरी निघोज, करंदी, वडगाव दर्या, सावरगाव व भाळवणी भाविकांच्या वतीने समाधान व्यक्त केले आहे.
COMMENTS