आमदार लंकेचा उपस्थीत कामोठ्यात फुटणार पारनेरकरांची दहीहंडी!

आ. लंके यांची उपस्थिती | पाच लाख ५५ हजार ५५५ रूपयांच्या बक्षिसांची होणार लूट; विविध कार्यक्रमांचे आयोजन पारनेर | नगर सह्याद्री  मुंबईस्थित प...


आ. लंके यांची उपस्थिती | पाच लाख ५५ हजार ५५५ रूपयांच्या बक्षिसांची होणार लूट; विविध कार्यक्रमांचे आयोजन

पारनेर | नगर सह्याद्री 

मुंबईस्थित पारनेरकरांच्यावतीने मुंबई उपनगरातील कामोठे या ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पाच लाख ५५ हजार ५५५ रुपयांच्या बक्षिसांची लूट करण्याची संधी गोविंदा पथकांना यानिमित्ताने प्रथमच मिळणार आहे. गुरुवार दि. ७ सप्टेंबर रोजी संत शिरोमणी तुकाराम महाराज मंदिर, सेटर ३६, कामोठे या ठिकाणी या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईस्थित पारनेरकरांच्यावतीने यावर्षी प्रथमच दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडी उत्सवासाठी अनेक नामांकित गोविंदा पथकांना निमंत्रित करण्यात आली असल्याची माहिती आयोजक भाऊ पावडे व कुंडलिक वाफारे यांनी दिली.

महिला पथकांचा थरांचा थरार!

पारनेर रहिवासी संघाच्या वतीने महिलांसाठी सुद्धा दहीहंडी लावण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र बक्षीस ठेवण्यात आली आहेत. याकरता मुंबईतील मानाची पथक निमंत्रित करण्यात आले असल्याचे कृष्णा ढोमे यांनी सांगितले. 

पारनेर तालुयातील अनेक लोक नोकरी व व्यवसायाच्यानिमित्ताने मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात स्थायिक झाले आहेत. नवी मुंबईतील कामोठे या ठिकाणी पारनेरकरांची जवळपास अडीच हजार कुटुंब वास्तव्यास आहेत. सर्व मुंबईस्थित पारनेरकरांनी एकत्रित येत काही दिवसांपूर्वी मुंबईस्थित पारनेर रहिवासी संघाची स्थापना केली असून त्या माध्यमातून प्रथमच दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या संघाच्या माध्यमातून या पुढील काळात देखील सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. दहीहंडी उत्सवासाठी पारनेर तालुयातील युवकांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला आहे. 

महिलांसाठी होम मिनिस्टर 

गोपाळकाला निमित्त पारनेर रहिवासी संघाच्या वतीने महाराष्ट्रात गाजलेला होम मिनिस्टर खेळ मांडीयेला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध निवेदक उत्तम घोलप या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत, महिलांसाठी लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. यासाठी पैठणी बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती राहुल आंग्रे यांनी दिली.

गुरुवार दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता दहीहंडीचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होणार आहे. त्यानंतर दहा वाजता गोविंदा पथकांच्या सलामीला सुरुवात होणार आहे. सायंकाळी मानाच्या पथकांचे थर लावण्यात येणार आहेत. त्याचबरोबर भजन संगीत, ऑर्केस्ट्रा, होम मिनिस्टर यासह अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील दिवसभर कार्यक्रम स्थळी होणार असल्याची माहिती आयोजकांच्यावतीने देण्यात आली. 

तसेच महिलांसाठी सुद्धा दहीहंडी लावण्यात येणार असून त्यांच्यासाठी स्वतंत्र बक्षीस ठेवण्यात आली आहेत.कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाऊ पावडे, कुंडलिक वाफारे, दिलीप घुले, कृष्णा ढोमे, निलेश आहेर, बन्सी पागिरे, प्रशांत ठुबे, राहुल आग्रे, समर नवले, सचिन वाफारे, दिलीप घुले, अक्षय मगर, वैभव शेळके, शुभम वाफारे, नितीन कवडे  विठ्ठल गलांडे महेश कवडे यांसह अनेक युवक मेहनत घेत आहेत.



COMMENTS

Name

Ahmednagar,7930,Akole,18,Breaking,4959,Business,46,Crime,1922,Editorial,28,Entertainment,1620,Epaper,29,Health,381,India,1176,Jamkhed,49,Karjat,11,Kopargaon,7,Maharashtra,5668,mumbai,3,Nagar,291,Newasa,66,Parner,3323,Pathardi,21,Politics,1643,Rahata,46,Rahuri,20,SadPadsad,20,sampadkiy,103,Sangamner,178,Saripath,53,Shevgaon,12,Shrigonda,163,Shrirampur,10,Sport,259,World,197,
ltr
item
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री: आमदार लंकेचा उपस्थीत कामोठ्यात फुटणार पारनेरकरांची दहीहंडी!
आमदार लंकेचा उपस्थीत कामोठ्यात फुटणार पारनेरकरांची दहीहंडी!
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjgtwmCEYa2_6vDW_ZW0CQB5KW3kzhotGzEAhaCRq1jriQxbMuTaAshyXRPgu4rUHG8euAgzPLArITwVvEh6nZRMlvuNB3SVA1GELg2LfdxlAYz3eeqWrgk_yiJvjuPpoYduMBg36rpqs-z82Jp5k9UhAESBZoJcTNWJ3WIXvE-Hfz9OToeV6vgfyob2N8/w640-h482/DAHIHANDI.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjgtwmCEYa2_6vDW_ZW0CQB5KW3kzhotGzEAhaCRq1jriQxbMuTaAshyXRPgu4rUHG8euAgzPLArITwVvEh6nZRMlvuNB3SVA1GELg2LfdxlAYz3eeqWrgk_yiJvjuPpoYduMBg36rpqs-z82Jp5k9UhAESBZoJcTNWJ3WIXvE-Hfz9OToeV6vgfyob2N8/s72-w640-c-h482/DAHIHANDI.jpg
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री
https://www.nagarsahyadri.com/2023/09/blog-post_14.html
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/2023/09/blog-post_14.html
true
3854568444215913215
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content