जालना / नगर सहयाद्री टीम मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाज पेटून उठला आ...
जालना / नगर सहयाद्री टीम
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाज पेटून उठला आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलने सुरु आहेत.
दरम्यान आता मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षावर लवकरच एक चित्रपट तयार होणार आहे. 'संघर्षयोद्धा' असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. जरांगेंचं उपोषण सुरु असलेल्या जालन्यातील अंतरवाली सराटी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने खुद्द जरांगे पाटील यांच्या हस्ते सिनेमाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
संघर्ष योद्धा या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे हे करीत आहेत तर अभिनेते रोहन पाटील हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. बड्डे आहे भावाचा, जल्लोष साऱ्या गावाचा या चित्रपटामुळे रोहनची लोकप्रियता वाढली.
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी जो लढा उभारला आहे, तो सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी 'संघर्षयोद्धा' या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती आहे. सिनेमाचे चित्रीकरण येणाऱ्या डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार असून मार्च २०२४ पर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सिनेमासाठी रिसर्च सुरु केला असून त्यांचे बालमित्र, शेजारी यांच्याशी चर्चा करुन अधिकाधिक माहिती मिळवली जात आहे. लवकरच स्क्रिप्ट लिहून तयार होईल अशी माहिती दिग्दर्शकांनी दिली.
COMMENTS