अहमदनगर / नगर सह्याद्री एमआयडीसी पोलिसांनी सराईत दुचाकी चोरास ताब्यात घेतले आहे. किशोर जयसिंग पटारे (रा. पिंपळगाव माळवी ता. जि. अहमदनगर) अ...
अहमदनगर / नगर सह्याद्री
एमआयडीसी पोलिसांनी सराईत दुचाकी चोरास ताब्यात घेतले आहे. किशोर जयसिंग पटारे (रा. पिंपळगाव माळवी ता. जि. अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याकडून तीन लाख १० हजारांच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
अधिक माहिती अशी : बाबासाहेब बापुराव तेलोरे (वय-43 वर्ष रा. व्यंकटेश अर्पाटमेंट नवनागापूर ता. जि. अहमदनगर) यांनी त्यांची शाईन मोटारसायकलची चोरी झाल्याची फिर्याद दिली होती.
गुन्ह्याचा तपास करत असताना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी किशोर जयसिंग पटारे याने केला आहे. यानुसार सपोनि राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करून किशोर पटारे यास ताब्यात घेत विचारपूस केली.
त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी चार मोटारसायकल जप्त केल्या आहेत. आरोपीवर अनेक गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले आदींच्या मार्गदर्शानाखाली सपोनि राजेंद्र सानप (प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन), पोना / गणेश चौधरी, पोना/ बंडु भागवत, पोना / राजु सुद्रीक, पोना/राजपूत, पोकॉ/किशोर जाधव, पोकॉ/ नवनाथ दहिफळे, पोकों / भगवान वंजारी यांच्या पथकाने केली आहे.
COMMENTS