पुणे। नगर सहयाद्री- विधेचे माहेरघर असलेल्या आपल्या पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. एमपीएससी पास दर्शना पवार प्रकरणामुळे प...
पुणे। नगर सहयाद्री-
विधेचे माहेरघर असलेल्या आपल्या पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. एमपीएससी पास दर्शना पवार प्रकरणामुळे पुणे हादरून गेलं होतं.ही घटना ताजी असताना परत एकदा पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
हडपसरमधील रामटेकडी परिसरात किरकोळ वादातून पाच अल्पवयीन मुलांनी एका युवकाची हत्या केली आहे. महादेव रघुनाथ मोरे (रा. काळेपडळ, हडपसर) असे मृत युवकाचे नाव आहे.
महादेव हा एका खासगी कंपनीत नोकरीला होते. काही दिवसांपूर्वीच महादेवचे आणि या मुलाचे किरकोळ कारणावरून वाद झाले होते. वादाचा राग मुलाच्या डोक्यात भिन्न-भिन्न करत होता.
मुलांनी पुन्हा महादेवला घेरलं. महादेवाला रामटेकडी परिसरातील ढेरे कंपनीजवळच्या डोंगरावर मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी सोबत घेऊन गेले. भर नशेमध्ये असतांना पुन्हा वाद सुरु झाला.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दरम्यान मुलांनी महादेवची दगडाने ठेचुन हत्या केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी ५ अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS