नगर सहयाद्री टीम : अॅक्सिस बँकेच्या कॅश व्हॅनवर दरोडा पडल्याचे वृत्त हाती आले आहे. लुटायला आलेल्या दरोडेखोरांनी बँकेच्या गार्ड, कॅशिअरसोबत...
नगर सहयाद्री टीम : अॅक्सिस बँकेच्या कॅश व्हॅनवर दरोडा पडल्याचे वृत्त हाती आले आहे. लुटायला आलेल्या दरोडेखोरांनी बँकेच्या गार्ड, कॅशिअरसोबत तीन जणांवर गोळीबार केल्याचे वृत्त आहे.
यामध्ये गार्डचा मृत्यू झाला असून कॅश व्हॅनमधील पैसे घेऊन दरोडेखोर पळून गेले आहेत. त्यांनी जवळपास २२ लाखांची कॅश नेली आहे.
सदर घटना मिर्झापूरमध्ये घडली आहे. जे दरोडेखोर होते त्यांचा फोटो तेथील इमारतीमध्ये राहणाऱ्यांनी काढला आहे. दोघांनी हेल्मेट घातले होते व त्यांच्या हातात पिस्तूल होती.
घटनास्थळी पोलीस पोहोचले असून तपास सुरु करण्यात आला आहे. २०२१ मध्य़ेही अशाप्रकारचा दरोडा पडला होता. तेव्हा ५० लाख रुपये घेऊन दरोडेखोर पळाले होते. दरम्यान या दरोड्यानंतर खळबळ उडाली आहे.
COMMENTS