बुलढाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अनिल बावस्कर यांच्यावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बुलढाणा । नगर सह्याद्री
बुलढाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अनिल बावस्कर यांच्यावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हल्ल्यावेळी अनिल बावस्कर सावध असल्याने हल्लेखोरास पकडण्यात यश आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, अनिल बावस्कर यांची शहरातील जयस्तंभ चौकात इडली-डोसाची हातगाडी असून रात्री नऊच्या दरम्यान तोंड बांधून आलेल्या तिघांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी सावध असल्यामुळे बावस्कर यांनी रॉड पकडून हल्लेखोरास लाथ मारली.
त्यानंतर आजूबाजूचे नागरिक बावस्कर यांच्या मदतीला धावले. हल्लेखोराला पकडून त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. जालना येथील हल्लेखोर असल्याचे माहिती पोलीसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादीचे नेते नरेश शेळके, काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस दाखल झाले होते.
COMMENTS