सरिता हरीओम जागिंड (४०) या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पुणे । नगर सह्याद्री
दौंड येथे आई आणि मुलीच्या भांडणात आईने मुलीला लाथा बुक्क्याने मारून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घडलेली घटना बुधवारी सायंकाळच्या दरम्यान घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेत दीक्षा हरिओम जागिंड (१८) या मुलीचा मृत्यू झाला आहे.
सरिता हरीओम जागिंड (४०) या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मुलीचे वडील हरिओम जागिंड यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आई आणि मुलगी यांच्यामध्ये घरगुती कारणावरून वाद झाल्याने खून झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ओम हरीओम जांगिड हे मूळचे राजस्थान येथील रहिवासी असून ते रेल्वेच्या नोकरी निमित्ताने दौंड येथे वास्तव्याला आले आहेत. खून झालेली मुलगी दीक्षा ही इयत्ता बारावीत शिक्षण घेत होती. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत करत आहेत.
COMMENTS