पवईमध्ये २३ वर्षीय एअर हॉस्टेसची हत्या झाल्याची प्रकार समोर आला आहे. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
मुंबईतील पवई भागात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पवईमध्ये २३ वर्षीय एअर हॉस्टेसची हत्या झाल्याची प्रकार समोर आला आहे. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे. रुपल ओगरे असे ठार झालेल्या मुलीचे नाव आहे. मरोळ येथील एअर होस्टेसचा मृतदेह आढळून आला आहे. मुलीचा गळा चिरून हत्या करण्यात आली आहे.
रुपल ओगरे ही मूळची रायपूरची आहे. ती मरोळ येथील एनजी कॉम्प्लेक्समध्ये राहत होती. ती तिची बहीण आणि तिच्या मित्रासोबत त्याच फ्लॅटमध्ये राहत होती. मात्र दोघेही गावी गेले होते. रुपलच्या कुटुंबीयांनी तिला फोन केला, मात्र ती फोन उचलत नसल्याने घरच्यांनी तिच्या मित्राला याची माहिती दिली.
त्यावेळी मित्र तिच्या घरी पोहोचला असता दार ठोठावूनही कोणीच दार उघडले नाही. दरवाजा तोडला असता घटनेची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच पवई पोलीस आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पुढील तपास सुरू केला आहे.
COMMENTS