अहमदनगर | नगर सह्याद्री जालना येथील अंतरावाली सराटी येथे मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागल्...
अहमदनगर | नगर सह्याद्री
जालना येथील अंतरावाली सराटी येथे मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने नगरमध्ये उपोषण व मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, या घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, मराठा आरक्षण लागू करावे, अशी मागणी मोर्चेकर्यांनी केली.
जालना येथे मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलन करणार्यांवर बेछुटपणे लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचा राज्यभर निषेध नोंदवला जात आहे. लाठीचार्जमुळे राज्यभर संतप्त आंदोलनकर्त्यांकडून एसटीची तोडफोड, जाळपोळ केली जात आहे. त्यामुळे सर्व एसटी व्यवस्था बंद ठेवली आहे. तसेच चौथे शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने उपोषण सुरु करण्यात आले आहे. दुसरीकडे सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून दुचाकी रॅली काढण्यात आली.
या आंदोलनात आमदार संग्राम जगताप यांच्यासह विविध संघटना सहभागी झाल्या होल्या. दुचाकी रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरु झाली. माळीवाडा, आशा टॉकीज चौक, भिंगारवाला चौक, तेलीखुंट, दिल्लीगेट, चौथे शिवाजी महाराज पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयपर्यंत काढण्यात आली. मराठा समाजास आरक्षण द्यावे, हल्लेखोरांवर कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
निष्ठूर फडणवीसांनी मराठ्यांची माफी मागत राजीनामा द्यावा : कुमटकर
स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या वतीने एक दिवसाचे अन्नत्याग
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज व गोळीबाराचा निषेध करण्यासाठी अहमदनगर शहरातील स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या वतीने कालच रात्रीपासून एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
यावेळी बोलताना संघटनेचे धिरज कुमटकर म्हणाले यावर एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देवून मराठ्यांवर तुटून पडणा-या दोषींवर कायमस्वरूपीच्या निलंबनाची कार्यवाही करावी.मराठा समाजातील महिला व बालकांवर लाठीचार्ज व गोळीबार करण्यात आला. महिला गंभीर जखमी झालेल्या आहेत ५८ मराठा मोर्चे जगात आदर्श ठरले. मग अंतरवाली सराटीचे आंदोलन चिरडण्यासाठी इतका आततायी कृत्य का असा प्रश्नही कुमटकर यांनी उपस्थित केला. गृहमंत्री फडणवीसांनी ब्रिटिशांप्रमाणे वागत निष्ठूरता दाखवली आहे त्यामुळे त्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे असेही धिरज कुमटकर म्हणाले.विनीत गाडे शुभम पांडूळे आणि यशवंत तोडमल यांनी विद्यार्थ्यांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे. यावेळी अमोल गाडे,डॉ अमित पवार, डॉ गणेश जंगले गजानन भांडवलकर, निलेश म्हसे,प्रविण गांगर्डे,मयुर ढगे,हेमंतराव मुळे,राजेंद्र ससे आदिंसह मराठा समाजातील नागरिक सहभागी झाले होते
COMMENTS