अहमदनगर / नगर सह्याद्री मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा गाजत आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव जोडलं गेल्याची चर्...
अहमदनगर / नगर सह्याद्री
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा गाजत आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव जोडलं गेल्याची चर्चा झाल्याने हा घोटाळा जास्त चर्चिला गेला. परंतु यात आता ED कडून आज दोन नवीन चार्जशीट दाखल करण्यात आलं असून यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील 14 नेत्याचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अहमदनगरमधील आमदार प्राजक्त तनपुरे यांचाही समावेश आहे.
मार्चमध्ये ईडीकडून जरंडेश्वर साखर कारखाना प्रकारणी चार्चशीट दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात अजित पवार आणि सुमित्रा पवार यांचा संबंध असल्याच बोललं जात होतं. मात्र पुढे त्यांचं नाव यातून वगळण्यात आलं.
आज ईडीकडून पुन्हा दोन चार्चशीट दाखल करण्यात आल्या आहेत. यात राम गणेश गडकरी साखर कारखाना प्रकरणी प्राजक्त तनपुरे आणि रणजित देशमुख यांचे नाव यात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
दुसरी चार्चशीट जालना कॉ. स. साखर कारखाना प्रकरणी दाखल करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. या चार्चशीटमध्ये शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर, शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले समीर मुळे यांच्याही नावाचा समावेश असल्याची माहिती समोर आलीय.
तर याचं प्रकरणात तापडिया बिल्डर समूहाचे व्यवस्थापकीय संचालक जुगल किशोर तापडिया यांच्या नावाचा ही समावेश यात आहे.
COMMENTS