या हल्ल्यामध्ये एक नातेवाईकही जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नवी दिल्ली । नगर सह्याद्री
रात्रीच्या वेळी भररस्त्यावर भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने संपूर्ण बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. बिहारमधील सिवानमध्ये भाजपा नेत्याच्या हत्येने स्थानिक राजकारण तापल्याचे दिसून येत आहे.
संध्याकाळच्या दरम्यान रात्री घरी परतत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये एक नातेवाईकही जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबाराचा आवाज ऐकताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु दुर्दैवाने भाजपा जिल्हाध्यक्षाचा जागीच मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा तपास करत आहेत.
माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास भाजपाचे प्रभाग अध्यक्ष शिवाजी तिवारी हे कार्यालयातून घरी जात असताना त्याच्यासमावेत त्यांचा मेहुणा देखील दुचाकीवर बसला होता. अशातच भररस्त्यात दुचाकीवरून हल्लेखोर घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. मेहुण्याला एक गोळी लागली असून तो गंभीर जखमी आहे.
COMMENTS