गणपती बाप्पा माेरया...मंगलमूर्ती माेरया...एक दाेन तीन चार...गणपतींचा जयजयकार करत आज (मंगळवारी) तळकोकणात घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होत आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
सिंधुदुर्ग मध्ये गणपतीचा उत्सव पाहिला दिसत आहे. गणपती बाप्पा माेरया...मंगलमूर्ती माेरया...एक दाेन तीन चार...गणपतींचा जयजयकार करत आज (मंगळवारी) तळकोकणात घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. भाविकांचा उत्साह पाहिला दिसत आहे.
तळकोकणात घरोघरी आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात घरी आणला जात आहे. चाकरमानीही तळकोकणात दाखल झाले आहेत. गणेशोत्सवानिमित्त काेकण येथील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७१ हजार ७८९ घरगुती आणि ३५ सार्वजनिक गणेशमूर्तींची विराजमान होणार आहेत. गणेशोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्व बंदोबस्त करण्यात आला आहे.
एकूण ४७ पोलीस अधिकारी, २५० हवालदार आणि ३५० होमगार्ड, दोन दंगल नियंत्रण पथके या उत्सवादरम्यान चोवीस तास सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली आहेत. एकूणच सिंधुदुर्गात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे.
COMMENTS