मुंबई। नगर सहयाद्री- आजपर्यंत तुम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांना इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरित करण्याची कथा ऐकली असेल, परंतु ओडिशाच्या...
मुंबई। नगर सहयाद्री-
आजपर्यंत तुम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांना इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरित करण्याची कथा ऐकली असेल, परंतु ओडिशाच्या इलेक्ट्रिक रिक्षा चालकाने चमत्कार केला आहे. त्यांनी आपल्या इलेक्ट्रिक ऑटोचे रूपांतर सोलर ऑटोमध्ये केले आहे.
ओडिशातील नयागड जिल्ह्यातील एका रिक्षा चालकाने फक्त यूट्यूब पाहून इलेक्ट्रिक ट्रायसायकलचे सौर उर्जेवर चालणाऱ्या वाहनात रूपांतर केले आहे. अशा प्रकारची ही पहिलीच घटना समोर आली आहे.
त्याचा हा शोध आश्चर्यचकित करणारा आहे. इलेक्ट्रिक वाहनांना समर्थन देणाऱ्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण करतो. सौरऊर्जेवर चालणाऱ्या वाहनात रूपांतरित करण्यासाठी यूट्यूब व्हिडिओची मदत घेतली आहे.
सौरऊर्जेवर चालणारे वाहन एका चार्जवर १४० किमीपर्यंत प्रवास करू शकते, असा त्यांचा दावा आहे. या शोधामुळे त्यांची कमाई १३०० रुपयांवरून १५०० रुपयांपर्यंत वाढली आहे.
COMMENTS