आरोपीने साडेचार कोटी रुपयांची रोख रक्कम आणि कार लुटली त्यानंतर आरोपी फरार झाले.
वर्धा । नगर सह्याद्री
नागपूर -हैद्राबाद मार्गावर चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून कोट्यावधींच्या रोख रकमेसह कार पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे वर्धा परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
बुधवारी संध्याकाळच्या दरम्यान नागपूरहून हैद्राबादच्या दिशेने कार निघाली असताना पाठीमागील करणे ओव्हरटेक केले. पुढे जाऊन कार थांबवली आणि कारमधील तिघेजण खाली उतरून त्यांनी मागच्या कारमधील चालकाला बंदुकीचा धाक दाखवत कार थांबविली. त्यानंतर आरोपीने साडेचार कोटी रुपयांची रोख रक्कम आणि कार लुटली त्यानंतर आरोपी फरार झाले.
याप्रकरणी कारचालकाने आरोपीविरोधात वडनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक करून रोख रक्कम हस्तगत केली. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीकडून अधिक तपास सुरु आहे.
COMMENTS