या दोघांनी एकाच दोराला गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती पारशिवनी पोलिसांनी दिली.
नागपूर । नगर सह्याद्री
पारशिवनी तालुक्यातील पेंढरी येथे एका महाविद्यालयीन प्रेमी युगलाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गौरव राजेंद्र बघमारे (१८) आणि जानव्ही जीवन नायले (१८) या दोघांनी एकाच दोरीला गळफास घेऊन त्यांचे आयुष्य संपवले आहे.
गौरव हा सावनेर येथील आयटीआयमध्ये शिक्षण घेत असून जानव्ही पारशिवनीच्या हरिहर महाविद्यालयामध्ये बारावी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत होती. गेल्या कित्येक वर्षांपासून दोघांचे प्रेमप्रकरण सुरु होते. परंतु घरच्यांनी विवाहास परवानगी न दिल्याने त्यानी टोकाचे पाऊल उचलले. सोमवारी या दोघांनी संपर्क केला त्यानंतर त्यांनी मध्यरात्री आत्महत्या केली .
या दोघांनी एकाच दोराला गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती पारशिवनी पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पारशिवनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
COMMENTS