जवान हा येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून त्याच्या अॅडव्हान्स बुकींगला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
मुंबई । नगर सह्याद्री
शाहरुखच्या जवानचा ट्रेलर व्हायरल झाला असून चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या ट्रेलरमध्ये आलियाचं नाव घेतल्यानं चाहत्यांची उत्सुकता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. चाहते तो हम आलिया भट्ट को भी, असे वक्तव्य शाहरुखने केले आहे. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. यावरच आलियानं शाहरुखच्या त्या संवादावर प्रतिक्रिया दिल्याने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे.
सात सप्टेंबरला शाहरुखचा जवान हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यापूर्वीच्या पठाण चित्रपटाचे प्रेक्षकांनी कौतुक वर्षाव केले होते. जवानचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि त्यातील संवादामुळे तो चर्चेत आला. त्यात शाहरुखनं बच्चे को हात लगाने से पहले बाप से पुछना चाहिए असे म्हणून आर्यन खानच्या त्या प्रकरणाला उजाळा दिल्याने सगळीकडे चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर शाहरुख खाननं एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचे म्हटले गेले आहे.
त्यानंतर वानखेडे यांनी देखील शाहरुखला अप्रत्यक्षपणे जशास तसे उत्तर दिले आहे. आपण आगीशी खेळलो आहोत. त्यातून तावून सुलाखून निघालो आहोत. त्यामुळे आपल्याला कुणीचीही भीती वाटत नाही. अशी प्रतिक्रिया वानखेडे यांनी ट्विट करत दिली आहे. आलिया म्हणते की, मला माहिती आहे शाहरुखनं माझे नाव घेतले. पण साऱ्या जगाला शाहरुख हवा आहे. अशा शब्दांत आलियानं शाहरुखचा गौरव केला.
शाहरुखचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जवानकडे पाहिला जात असल्याने पॅन इंडिया अंतर्गत या प्रोजेक्टमध्ये साऊथचा विजय सेतुपति, नयनतारा, प्रियामणि, सान्या मल्होत्रा यामध्ये भूमिका साकारणार आहेत. जवान हा येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून त्याच्या अॅडव्हान्स बुकींगला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. शाहरुख आणि आलियानं यापूर्वी डियर जिंदगी या चित्रपटामध्ये एकत्रित काम केला असून तो चित्रपट प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरला होता.
COMMENTS