पीडितेस अत्याचार केल्यानंतर मारहाण देखील करण्यात आली आहे. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
अहमदनगर | नगर सह्याद्री
महिलेवर बळजबरीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडितेस अत्याचार केल्यानंतर मारहाण देखील करण्यात आली आहे. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटना मंगळवारी (दि. 5) सायंकाळी नगर तालुक्यातील एका गावात घडली. राहुल भिकाजी भोसले (रा. गुंडेगाव ता. नगर) असे आरोपीचे नाव आहे.
समजलेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी फिर्यादी नैसर्गिक विधीसाठी एका शेतात गेल्या होत्या. त्याच वेळी आरोपी भोसले हा त्यांच्या पाठीमागे गेला व त्याने फिर्यादीवर बळजबरीने अत्याचार केला. फिर्यादीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे आरोपीने त्यांना मारहाण केली. सदर प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर तुला जिवे सोडणार नाही, अशी धमकी दिली. दरम्यान, फिर्यादीने झालेला प्रकार सासर्याला सांगितला. त्याचा भोसले याला राग आल्याने त्याने कुर्हाडीच्या दांडक्याने मारहाण केली. फिर्यादीचे सासरे मध्ये आले असता भोसले याने त्यांना देखील मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करीत आहेत.
COMMENTS