अहमदनगर / नगर सह्याद्री Ahmednagar Crime : एसटी बस चालकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भिंगार कॅ...
अहमदनगर / नगर सह्याद्री
Ahmednagar Crime : एसटी बस चालकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी मुकुंदनगर भागातून दोघांना ताब्यात घेतले आहे.
मुजिब ऊर्फ भुन्या अजिज खान (रा. मुल्ला कॉलनी, मुकुंदनगर) व आरीफ जाबीर खान (रा. दगडी चाळ, मुकुंदनगर) असे आरोपींची नावे आहेत. सोपान विठ्ठल पवार असे मारहाण झालेल्या बसचालकाचे नाव आहे.
बस चालकाला मारहाण करणारे दोघे मुकुंदनगर भागात असल्याची माहिती सहा.पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांना मिळाली होती. त्यांनी एक पथक पाठवून दोघांचा शोध घेत त्यांना अटक केली आहे.
ते दोघे सराईत गुन्हेगार आहेत. सदरची कामगिरी सहा. निरीक्षक मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण साळुंके, अंमलदार कैलास सोनार, रेवननाथ दहिफळे, संदीप घोडके, रामनाथ डोळे, दीपक शिंदे, अमोल आव्हाड यांच्या पथकाने केली आहे.
COMMENTS