कोपरगाव / नगर सह्याद्री : Ahmednagar news : समाजात काय घडेल हे सांगता येणे मुश्किल झाले आहे. गुन्हेगारी घटना देखील वाढत चाललेल्या दिसतात. ...
कोपरगाव / नगर सह्याद्री :
Ahmednagar news : समाजात काय घडेल हे सांगता येणे मुश्किल झाले आहे. गुन्हेगारी घटना देखील वाढत चाललेल्या दिसतात. आता आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे.
आर्थिक कारणावरून झालेल्या भांडणांना तरुणाच्या डोक्यात फावडे टाकले . यात त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दिपक दादा गांगुर्डे (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. सदर घटना कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात काही आर्थिक कारणावरून भांडणे झाली. आरोपींनी त्यांच्या ताब्यात असलेल्या फावड्याच्या दांड्याने दीपक दादा गांगुर्डे (वय ३५) या युवकाला डोक्यात गंभीर दुखपत केली या झालेल्या मारहाणी दीपक गांगुर्डे याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी चार जणांविरुद्ध कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात चालायचे समजते. कोपरगाव तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यात सदर घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आले होते.
COMMENTS