घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले.
नाशिक । नगर सह्याद्री
नाशिक जिल्ह्यामध्ये पतीने पत्नीची झोपेतच निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर स्वत: देखील गळफास घेऊन आयुष्य संपवले आहे. घडलेला प्रकार बुधवारी पहाटेच्या दरम्यान घडला. विशाल निवृत्ती घोरपडे आणि प्रीती विशाल घोरपडे अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत विशाल घोरपडे पत्नी प्रीती घोरपडे यांच्यामध्ये वाद झाल्याने प्रीती गाढ झोपेमध्ये असताना विशालने बुधवारी पहाटेच्या सुमारास तिची हत्या केली. प्रीती झोपेत असताना विशालने घरातील मुसळीने तिच्या डोक्यामध्ये वार केला. घडलेल्या घटनेमध्ये प्रीतीचा जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या हत्येनंतर विशालने घरामध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. मृतदेहाचे कारण अद्याप समोर आले नाही. पतीने पत्नीची हत्या करुन स्वत: ही गळफास घेतल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
COMMENTS