बहिणीला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देऊन तिझ्यावर अत्याचार केले. घरामध्ये कोणास सांगितले तर जिवे मारण्याची धमकी दिली.
सातारा । नगर सह्याद्री
कोरेगाव तालुक्यामधील एका गावात १७ वर्षीय भावानेच १५ वर्षीय बहिणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बहीण गरोदर राहिली असून, पोलिसांनी भावाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय मुलगी शाळा सोडून घरामध्येच राहत होती. घरामधील परिस्थिती हलाखीची असल्याने आई-वडील मोलमजुरीचे काम करत होते. मुलीचा भाऊ नातेवाइकांकडे राहत होता. घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन पीडितेचा भाऊ एके दिवशी दुपारच्या दरम्यान घरी आला. त्यानंतर बहिणीला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देऊन तिझ्यावर अत्याचार केले. घरामध्ये कोणास सांगितले तर जिवे मारण्याची धमकी दिली.
आठ महिन्यांपासून भाऊ वारंवार बहिणीवर अत्याचार करत राहिल्याने तिच्या हातापायाला सूज आली होती. आईने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेहल्यावर मुलगी गरोदर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुलीच्या आईला व पोलिसांना कळवली. मुलीला विचारल्यानंतर सख्ख्या भावाने अत्याचार केल्याचे समोर आले.
COMMENTS