अदा शर्माने २००८ साली विक्रम भट्ट यांच्या १९२० या सिनेमातून तिने कलाविश्वात पदार्पण केले होते.
अभिनेत्री अदा शर्मा सध्या तिच्या द केरळ स्टोरी या चित्रपटामुळे प्रसिद्धीस आली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये तिच्या भूमिकेचं कौतुक केलं जात आहे. यामध्येच आता अदा शर्माचा नऊवारी साडीतील मराठमोळा लूक चर्चेत आला आहे.
या अभिनेत्रीचं मराठी भाषेबद्दलचे प्रेम प्रचंड आहे. तिला मराठी गाणी आणि कविता तोंडपाठ असल्याने ती चाहत्यांसोबत अस्खलित मराठी भाषेत बोलत असतानाचा व्हिडीओ शेअर करत असते. अदा शर्मा नुकतीच दहीहंडी उत्सवात सहभागी झाली होती. यावेळी तिने नाकात नथ, टिकली आणि पारंपारिक नऊवारी साडी आणि नऊवारी साडीवर स्निकर्स असा लूक केला होता.
घातलेली साडी तिच्या आजीची असल्याचे तिने सांगितले. अभिनेत्रीच्या या लुकवर नेटकऱ्यांनी अनेक भन्नाट कमेंटस केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं की, या कपड्यांमध्ये तू खूप छान दिसत आहेस. तर एकाने बस्स अशाच मुलीची आयुष्यात कमी आहे, असे म्हटलं. तर भारतीय संस्कृती व मराठमोळी संस्कृती या चित्रात दिसून येते, असे एका युजरने म्हटले.
अदा शर्माने २००८ साली विक्रम भट्ट यांच्या १९२० या सिनेमातून तिने कलाविश्वात पदार्पण केले होते. अदाने हिंदीसह तेलुगू आणि तामिळ सिनेमांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे साऊथमध्येही तिची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. अदाने केवळ १२ वी शिक्षण पूर्ण केले असून ती अभिनय क्षेत्रात आली आहे. अदा १० वीत असतानाच तिने अभिनेत्री होण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार, तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
COMMENTS