महिलेच्या घरातील कपाटातील ५ ते ६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, लॅपटॉप, डोंगल व मोबाईल अशा सर्व वस्तू जबरदस्तीने घेऊन पसार झाला.
पुणे । नगर सह्याद्री
महिला पोलीस कर्मचार्याला गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्या महिलेवर बलात्कार केला. महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दीपक सिताराम मोघे या पोलीस शिपायाविरोधात खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी शहर पोलीस दलात नेमणूकीला असून स्वारगेट पोलीस वसाहतीमधील स्थायिक आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत आरोपी दीपक मोघे याने महिलेशी मैत्रीचे संबंध वाढवले, त्यानंतर पोलीस कर्मचारी त्या महिलेच्या घरी जेवणासाठी जात होते. त्यादरम्यान महिलेला कोल्ड्रींकमधून गुंगीकारक औषध दिले. त्यानंतर महिलेसोबत शारीरिक संबंध ठेऊन त्याचा व्हिडिओ बनवला.
पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेच्या घरातील कपाटातील ५ ते ६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, लॅपटॉप, डोंगल व मोबाईल अशा सर्व वस्तू जबरदस्तीने घेऊन पसार झाला. याप्रकरणी खडक पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक तोटेवार करत आहेत.
COMMENTS