बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात एका २५ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
बुलढाणा जिल्ह्यातून धक्क्कादायक बातमी समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात एका २५ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आल्याने ही भीषण घटना घडली असून आरोपी त्रिशरण रामदास इंगळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गावातील आकाश सुरेश परघरमोर या २५ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे मृत्यू मुलगा आणि आरोपीची पत्नी यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून भरदिवसा ही हत्याकांड करण्याचा प्रकार घडला आहे.
आरोपी त्रिशरण इंगळेची पहिली पत्नी काही वर्षांपूर्वी मुलांना येथे सोडून पळून गेली होती. चारित्र्यावर संशय असल्याने त्याचे दुसऱ्या पत्नीशी अनेकदा भांडण होत असे. ९ सप्टेंबर रोजी त्रिशरणने पत्नीला मारहाण केल्यावर ती आपल्या मुलीसह माहेरी निघुन गेली होती. मृत आकाश आणि त्याच्या पत्नीमध्ये प्रेमसंबंध असल्याचा त्रिशरणला संशय होता.
हा संशय मनात ठेऊन १० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता त्रिशरण याने आकाशवर चाकूने वार केले. या हल्ल्यात आकाशचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाला. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून आरोपीला अटक करण्यात आले आहे.
COMMENTS