मालक नीट वागत नसल्याच्या कारणावरून हॉटेल मालकला इलेक्ट्रिक शॉक देऊन गळा दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
अंबोलीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉटेल मालक नीट वागत नसल्याच्या कारणावरून हॉटेल मालकला इलेक्ट्रिक शॉक देऊन गळा दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आंबोलीत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
हॉटेल मालक नीट वागत नसल्याच्या कारणावरून मालकाला विजेचा शाॅक देऊन त्याचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आंबोलीत उघडकीस आली आहे. या घटनेत बेतशिबा शेठ (वय ४२) हे गंभीर जखमी झाले असून, स्व. बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले.
ही घटना रविवारी दुपारी रॉयल क्लासिक, ई विंग, १३ माळा न्यू लिंक रोड, अंधेरी पश्चिम येथे घडली. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी आरोपी राजकुमार सिंग (कुक) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस राजकुमार सिंगचा शोध घेत आहेत.
COMMENTS