अहमदनगर | नगर सह्याद्री नगर-जामखेड रस्त्यावर चिचोंडी पाटीलजवळ आष्टी डेपोची एसटी चारीत गेल्याने प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये शाळकरी विद्...
अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर-जामखेड रस्त्यावर चिचोंडी पाटीलजवळ आष्टी डेपोची एसटी चारीत गेल्याने प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
आष्टी डेपोची एसटी (एमएच ४०, एन ९२४०) सकाळी ८ वाजता आष्टीकडून नगरकडे जात होती. चीचोंडी पाटील जवळ स्वागत हॉटेल समोर रस्त्यालगत मोठी चारी खोदलेली होती. ड्रायव्हरकडून नजर चुकीने एसटी थेट चारीत गेल्याने हा अपघात झाला. यामध्ये २० ते २५ शाळकरी विद्यार्थी जखमी झाले आहेत. महिला व वृद्धही किरकोळ जखमी झाले आहेत. चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार व सदस्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना बसमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.
COMMENTS