पारनेर / नगर सह्याद्री - पारनेर तालुक्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा आदलाबदल होण्यास सुरुवात झाली आहे. खासदार सुजय विखे तालुक्याच्या दौऱ्...
पारनेर / नगर सह्याद्री -
पारनेर तालुक्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा आदलाबदल होण्यास सुरुवात झाली आहे. खासदार सुजय विखे तालुक्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर नेहमी मोठमोठ्या घडामोडी घडताना दिसत असतात.
खासदार विखे आज रविवारी पारनेर शहराच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी आमदार निलेश लंके यांच्यापासून नाराज होऊन दूर गेलेले पारनेर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली.
पाठीमागच्या पंधरा दिवसांपूर्वी राज्याचे महसूल मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे पारनेर दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी सुद्धा माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली होती. विखे पिता पुत्रांची ही भेट तालुक्याच्या राजकारणाचा मूड बदलणारी नक्कीच ठरेल हे सांगण्यासाठी आता कोणत्या भविष्यकाराची गरज राहिली नाही.
खासदार सुजय विखे यांनी माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली यावेळी औटी व विखे यांच्यात बंद दाराआड जवळपास अर्धा तास चर्चा झाली. यावेळी विजय औटी समर्थक मोठ्या संख्येने खासदार विखे यांचे स्वागत करण्यासाठी पारनेर शहरांमध्ये उपस्थित होते.
खासदार विखे यांचे पारनेर शहरांमध्ये विजय औटी समर्थकांनी घोषणा देत व जोरदार स्वागत केले. यावेळी खासदार विखे यांना विविध प्रश्नांच्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
निवेदनात असे म्हटले आहे की पारनेर- नगर विधानसभा मतदार संघात पावसाचे प्रमाण दरवर्षीपेक्षाप्रमाणे या वर्षी देखील कमी असल्याने पारनेर तालुक्यात पाण्याची टंचाई भासत असून जनावरांना वेळेवर चारा उपलब्ध होत नाही, तरी पारनेर व नगर तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा व जनावरांसाठी चारा छावण्या व चारा डेपो सुरु करणेत यावा.
तसेच मराठा आरक्षणाबाबत बीड व जालना जिल्हयात मराठा आंदोलकांनवर झालेल्या लाठीचार्जचा जाहीर निषेध करुन आंदोलकांना योग्य तो न्याय मिळवून दयावा. तसेच मराठा आरक्षणाकरीता ससंदेमध्ये विषय मांडण्यात यावा. असे मागणी करणारे निवेदन यावेळी विजय औटी यांनी खासदार सुजय विखे यांना दिले. यावेळी सचिन वराळ पाटील, राहुल पाटील शिंदे, किरण कोकाटे, अमोल मैड, विलास हारदे, असलमभाई इनामदार अमोल ठुबे, प्रितेश पानमंद, पुष्कराज बोरुडे, मंगेश कावरे, शेखर काशीद, शुभम टेकुडे, अंकुश सोबले, संदीप मगर, प्रथमेश रोहकले, महेश ठुबे, मयूर बोरुडे, धनंजय घुमटकर, आदी सुजयदादा विखे पाटील समर्थक व विजय औटी समर्थक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS