पारनेर | नगर सह्याद्री पारनेर शहरासह वाड्या वस्त्यावर टँकरच्या माध्यमातून दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले...
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर शहरासह वाड्या वस्त्यावर टँकरच्या माध्यमातून दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. टँकरच्या माध्यमातून आठ ते दहा दिवसांतून पाणी पुरवठा करण्यात येत असून होणारा हा दुर्गंधीयुक्त व दूषित पाणी पुरवठा आहे. त्यामुळे शहरास स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी भाजपाचे नगरसेवक अशोक चेडे यांनी मुख्याधिकारी विनय शिपाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मागणीची दखल न घेतल्यास नगरपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा नेण्याचा इशारा चेडे यांनी दिला आहे.
शहराच्या पाणी पुरवठयाबरोबरच निकृष्ट दर्जाच्या कामासह इतर प्रश्नांकडेही चेडे यांनी लक्ष वेधले आहे. तराळवाडी येथील कचरा डेपोचे काम निकृष्ठ असल्याकडे चेडे यांनी लक्ष वेधले आहे. प्रभाग क्र. ८ मधील पेव्हींग ब्लॉक बसविण्या अगोदर पी.सी. सी तसेच लेव्हल न करता बसविण्यात आले असून त्याची पाहणी करून कारवाई करण्यात यावी, नगरपंचायत हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर डासांचे साम्राज्य पसरले आहे, डासांचे निर्मुलन करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, सिध्देश्वरवाडी, चेडे मळा, कुरनडी या भागात स्ट्रीट लाईट बसविण्यात यावी, वेशीचे सुशोभिकरण करण्यात यावे, मटण मार्केटचे बांधकाम होऊनही मटन मार्केट शिफ्ट करण्यात आलेले नाही.
रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने मटण मार्केट शिफ्ट करण्यात यावे, प्रभाग क्र. १४ मध्ये समर्थ नगर येथील गटार योजना करण्यात यावी, या प्रभागातील सांडपाणी नाईलाजाने रस्त्यावर सोडावे लागत आहे. स्मशानभूमीतील कर्मचार्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. त्यांचे पगार वेळेवर करण्यात यावेत, स्ट्रीट लाईटचा लाईनमन त्याच्या मर्जीप्रमाणे कुठे दिवे बसवायचे, कुठे नाही हे ठरवितो. शहरातील सर्व रस्ते खराब झाले असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, ते बुजविण्यात यावेत. या मागण्या पुर्ण न झाल्यास नगर पंचायत कार्यालयासमोर ४ आंदोलन करण्याच्या इशारा चेडे यांनी दिला आहे.
COMMENTS