वडझिरे येथील बैठक विजय औटींसाठी ठरणार निर्णायक | ढोल ताशांच्या गजरात स्वागत पारनेर/निघोज | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे विठ...
वडझिरे येथील बैठक विजय औटींसाठी ठरणार निर्णायक | ढोल ताशांच्या गजरात स्वागत
पारनेर/निघोज | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात पारनेर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांची युवकांची बैठक पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने सर्वसामान्य युवक या बैठकीला उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष औटी यांचे वडझिरेकारांनी मोठ्या जल्लोषात फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशाच्या गजरात गावामध्ये स्वागत केले.
नगराध्यक्ष पदाचा राजीनामा घेतल्यानंतर आमदार निलेश लंके यांच्यावर नाराज झालेले विजय औटी लंके गटातून बाहेर पडत पारनेर तालुक्यात आता युवकांचे संघटन वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्या माध्यमातून ते पारनेर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दसर्याच्या शुभ मुहूर्तावर पारनेर या ठिकाणी त्यांनी युवकांच्या भव्य "युवा संवाद" मेळाव्याचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर मेळाव्याच्या नियोजनासाठी तालुक्याचा दौरा करत आहे.
तालुक्याचा राजकीय मूड बदलतोय
विजय औटी यांना तालुक्यात मिळत असलेला प्रतिसाद पाहता तालुक्याचे राजकीय चित्र पुन्हा एकदा आपल्याला बदलताना दिसत आहे. लोकप्रतिनिधींवर वाढत असलेली नाराजी कुठेतरी विजय औटी यांना साथ देते आहे असं जाणवते त्यामुळे तालुक्याचा राजकीय मूड बदलत असल्याचे दिसून येत आहे. ही लोकप्रतिनिधींसाठी धोक्याची घंटा आहे.
आमदार नीलेश लंके यांच्या विरोधात त्यांनी तालुक्यात आता चांगलाच मोर्चा उघडल्याचे दिसून येत आहे. वडझिरे येथे झालेल्या बैठकीसाठी ५०० पेक्षा जास्त युवक उपस्थित होते. त्यामुळे तालुक्याचा राजकीय मूड बदलत असल्याचे दिसून आले. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर विजय औटी यांना भेटत असलेला प्रतिसाद हा येणार्या काळात निर्णायक ठरणार असल्याचे लक्षात येते.
तालुक्यात हुकूमशाही पद्धतीने काम चालू आहे सर्वसामान्य युवकांना सुपा एमआयडीसी मध्ये रोजगार उपलब्ध करून दिला जात नाही युवकांवर अन्याय होत आहे याच्या विरोधात माजी खरी लढाई असल्याचे मत माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी वडझिरे येथील युवकांच्या झालेल्या बैठकीत उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले. वडझिरे येथे झालेल्या युवक बैठकीतून असे दिसून आले की तालुक्यातील राजकीय परिस्थिती आता बदलत आहे.
वडझिरे येथील बैठकीला युवकांचा प्रतिसाद
विजय औटी यांनी युवकांची वडझिरे येथे बैठक घेतली. बैठकीला मोठा प्रतिसाद मिळाला. ५०० पेक्षा जास्त युवक बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे तालुक्यात आता चित्र बदलताना दिसत आहे. विजय औटी यांना मोठा प्रतिसाद मिळाल्यास नवल वाटायला नको.
विजय औटी यांना प्रभावित होऊन त्यांच्यासोबत तालुक्यातील अनेक युवक जोडले जात आहेत. त्यामुळे तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांसमोर पुन्हा आव्हान उभे राहत आहे. वडझिरे येथे पार पडलेल्या बैठकीसाठी परिसरातून अनेक विजुभाऊ औटी समर्थक उपस्थित होते ही बैठक यशस्वी करण्यासाठी विजुभाऊ औटी युवा मंच वडझिरे व वडझिरे युवा मंच व समस्त ग्रामस्थ वडझिरेकर यांनी परिश्रम घेतले.
COMMENTS