मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन अहमदनगर | नगर सह्याद्री मराठा समाजाला ५० टक्केच्या आत ओबीसीतून आरक्षण मिळावे, मनोज जर...
मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन
अहमदनगर | नगर सह्याद्री
मराठा समाजाला ५० टक्केच्या आत ओबीसीतून आरक्षण मिळावे, मनोज जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा तसेच आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चातर्फे १३ सप्टेंबरला कायनेटिक चौेकात रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. तसे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे.
मराठा आरक्षणासाठी जालना येथील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु आहे. त्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी, मराठा समाजाला ५० टक्क्याच्या आत ओबीसीमधून आरक्षण मिळावे, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ मराठा समाज आक्रमक झाला आहे. जरांगे यांनी सुमारे १४ दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनाची दखल शासन घेत नसल्याने समाज संतप्त झाला आहे. येथील सकल मराठा तसेच मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने बुधवारी कायनेटिक चौकात सकाळी ११ वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.
या निवेदनावर नीलेश म्हसे, संजय चव्हाण, सचिन जगताप, सुरज ठोकळ, किशोर वाघ, राहुल घोडके, गिरीष भांबरे, उदय अनभुले, सुरेश इथापे ऋषिकेश सोमवंशी, विलास तळेकर, गजेंद्र दांगट, मयूर पवार, राजेंद्र कर्डिले, अभय शेंडगे, नितीन गव्हाणे, परमेश्वर पाटील, विजय तिवारी, राजेश सरमाने, सुरेश मिसाळ, संदीप जगताप, अनिकेत आवारे, श्रीपाद पठाडे, विलास तोडमल, उद्धव गागरे, रवी भूतकर, अमोल हुंबे आदींच्या सह्या आहेत.
COMMENTS