पारनेर | नगर सह्याद्री पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी पाणीटंचाई चारा टंचाई निर्माण झाली असून पावसाने ओढ दिल्याने शेतातील पिके जळाली आहे त...
पारनेर | नगर सह्याद्री
पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी पाणीटंचाई चारा टंचाई निर्माण झाली असून पावसाने ओढ दिल्याने शेतातील पिके जळाली आहे त्यामुळे या दुष्काळजन्य परिस्थिती पाहणी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रदेश कार्यकारी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी थेट शेतकर्यांच्या शेतात जाऊन पाहणी करत धीर दिला आहे.
गेल्या तीन महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पारनेथ तालुक्यातील अनेक भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.अनेक गावात खरिपाच्या पेरण्या झाल्या नसून ज्या ठिकाणी झालेल्या आहेत त्या ठिकाणची पिके जळाली आहेत त्यामुळे या दुष्काळ जन्मी परिस्थिती पाहण्यासाठी भाजप प्रदेश कार्यकारणीच्या वतीने माजी जिल्हा परिषद व प्रदेश कार्यकारणी सदस्य यांनी थेट शेतकर्याच्या शेतात जाऊन समस्या जाणून घेतल्या.
पारनेर तालुक्यातील विविध भागांत निर्माण झालेल्या वेगवेगळ्या समस्यांचे वास्तव प्रत्यक्ष शेतकर्यांकडून जाणून घेण्यासाठी भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य विश्वनाथ दादा कोरडे यांनी बुधवार दिनांक ३० ऑगस्ट रोजी पठारभागातील गावांसह पोखरी, पळसपुर, काटाळवेढा, डोंगरवाडी, गुरेवाडी या भागातील परीसराची पाहणी करून अनेक शेतकर्यांच्या भेटी घेतल्या. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून शासनदरबारी पाठपुरावा करत या प्रतिकुल परीस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी शेतकर्यांना दिली.
कोरडे पडलेले मांडओहळ धरण, पावसाअभावी सुकलेला भुईमुग, माना टाकलेले सोयाबीन, करपून गेलेली चारा पिके आणि करपलेल्या शिवाराला वळसा घालत पोटाची खळगी भरण्यासाठी स्पर्धा करणारी चराऊ जनावरं, दुभत्या जणावरांना चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावरून ट्रॅक्टर, पिक अप इत्यादी वाहनांच्या सहाय्याने चारा वाहतूक करणारे पशुपालक शेतकरी अन् टँकरद्वारे विहीरीत सोडलेले पाणी डोक्यावरून घरापर्यंत नेण्यासाठी संघर्ष करणारे गांवकरी व त्यांच्या आशाळभूत नजरा अशा परिस्थितीला कोरडे यांना यावेळी सामोरं जावे लागले. शेतीव्यवसायाची झालेली वाताहत तर दुग्धव्यवसायावर चार्याअभावी, जणावरांना लागत असलेल्या पिण्याच्या पाण्या अभावी लटकत असलेल्या टांगत्या तलवारीच्या उग्र वास्तवाविषयी या भागातील शेतकर्यांशी त्यांच्या शेतावर, त्यांच्या वस्तीवर तर पशुपालकांच्या गोठ्यावर जात त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधला.
पावसाने सरासरीपेक्षा कमी प्रमाणात हजेरी लावलेली असल्याने उद्भवलेल्या परिस्थितीविषयी या भागातील कार्यकर्त्यांकडून परिस्थितीविषयी माहीती समजताच कोरडे यांनी या भागातील परिस्थितीचे वास्तव जाणून घेण्यासाठी तातडीने स्थानिक शेतकरी, पशुपालकांसह या भागातील पदाधिकार्यांच्या भेटी घेतल्या, त्यांच्या कडुन उद्भवलेल्या परिस्थितीशी दोन हात करताना येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या, अधिकार्यांशी दुरध्वनी वरुन संवाद साधत परिस्थितीचं गांभीर्य विषद करून या भागातील मागण्यांची तातडीने दखल घेण्याच्या सुचना दिल्या. कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता या भागातील नागरिकांसह तालुक्यातील विविध गटांच्या नेतृत्वांनी एकदिलाने, एकसंघपणे काम केल्यास आपण या परीस्थितीशी नक्की यशस्वी सामना करु असा आशावादही कोरडे यांनी यावेळी व्यक्त केला.
COMMENTS