दिल्ली /नगर सह्याद्री समाजात अनेक काळीज हेलावणाऱ्या घटना घडताना दिसतात. महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. आता एक धक्काद...
दिल्ली /नगर सह्याद्री
समाजात अनेक काळीज हेलावणाऱ्या घटना घडताना दिसतात. महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. आता एक धक्कादायक बातमी आली आहे. 82 वर्षीय महिलेवर तरुणाने अत्याचार केला. त्यानंतर महिलेचे ब्लेडणारे ओठ कापले गेले.
या घटनेने एकच खळबळ उडालीआहे. सदर घटना दिल्लीमध्ये घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला बेड्या घातल्या आहेत. सध्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिल्लीतील नेताजी सुभाष प्लेस परिसरात घटना घडली यातील संशयित आकाश नावाच्या आरोपीला अटक केली. याची माहिती दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी दिली आहे. शुक्रवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वृद्ध महिला घरात झोपली असताना ही घटना घडली.
आरोपीने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. त्याने महिलेला बेदम मारहाण केली आणि ब्लेडने तिचे ओठ कापले. डीसीडब्ल्यूच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनीसुद्धा या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी एका ट्विटमध्ये दिल्ली पोलिसांकडून एफआयआरची प्रत मागितली आहे. याशिवाय त्यांनी दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची इतर माहिती महिला आयोगाला सांगण्यास सांगितले आहे.
COMMENTS