नगर सह्याद्री टीम 7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर भेटणार आहे. त्यांच्या पगारात सरकार लवकरच वाढ करणार आहे. ही वाढ के...
नगर सह्याद्री टीम
7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर भेटणार आहे. त्यांच्या पगारात सरकार लवकरच वाढ करणार आहे. ही वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार आहे. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार सप्टेंबर महिन्यात महागाई भत्त्यात वाढ करणार आहे. यानुसार सरकार महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करू शकते.
४ टक्के वाढ होईल
एका मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ होणार आहे. जानेवारी २०२३ पासून कर्मचाऱ्यांना ४२ टक्के दराने डीए मिळत आहे. या ४ टक्क्यांच्या वाढीनंतर कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए ४६ टक्के होईल.
याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही
अद्याप या वाढीची अधिकृत घोषणा सरकारने केलेली नाही. महागाई भत्त्यात वाढ करण्यास केंद्र सरकारकडून लवकरच मंजुरी मिळू शकते.
जर मूळ वेतन १८,००० रुपये असेल तर पगारात किती वाढ ?
- मूळ पगार - १८,००० रुपये प्रति महिना
- नवीन महागाई भत्ता - ८२८० रुपये प्रति महिना (४६ टक्के)
- सध्याचा DA - रु. ७५६० प्रति महिना (४२%)
- किती वाढले - ७२० रुपये प्रति महिना
- वार्षिक पगार वाढ - ७२०X१२ - रु ८६४०
जर मूळ वेतन ५६,९०० प्रति महिना रुपये असेल तर पगारात किती वाढ ?
- मूळ पगार – रु ५६,९०० प्रति महिना
- नवीन महागाई भत्ता – दरमहा २६,१७४ रुपये (४६ टक्के)
- सध्याचा डीए - रु २३,८९८ प्रति महिना (४२ टक्के)
- किती वाढले - रु २६,१७४-२३,८९८ - रु २२७६ प्रति महिना
- वार्षिक पगार वाढ - २२७६ X १२ - रु २७३१२
COMMENTS