पु णे / नगर सह्याद्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका निर्णयाने आमदारांना खुशख...
पुणे / नगर सह्याद्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका निर्णयाने आमदारांना खुशखबर मिळाली आहे. राज्यभरातील 345 आमदारांसाठी प्रत्येकी 70 लाख रुपये निधीची मान्यता देण्यात आली आहे.
राज्य सरकारने 241 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता प्रत्येक आमदारास 70 लाखांचा निधी मिळणार आहे. सरकारने सदर मंजूर निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केला असून आमदारांच्या कामांना मान्यता देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
याआधी आमदारांना 40 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र आता 70 लाखांचा निधी आमदारांना देण्यात आलाय. राज्य सरकारने विधानसभा आणि विधानपरिषद दोन्ही सभागृहातील आमदारांसाठी निधीचं वितरण केलं आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस अशा विरोधी पक्षांच्या आमदारांसह सर्वांना निधी देण्यात आला आहे. मागील वेळी निधी वाटपामध्ये कुणाला कमी व कुणाला जास्त याच्याच चर्चा रंगल्या होत्या. वाटपावरून कोण पक्ष सोडेल व कोण पक्ष बदलेल यांच्याची चर्चा रंगू लागल्या होत्या. परंतु यावेळी सर्वसामान निधी वाटप करण्यात आले आहे.
COMMENTS