नगर सह्याद्री टीम कॅन्सर अर्थात कर्करोग या आजाराला सर्वच भितात. कारण हा एक जीवघेणा आजरा आहे. याला दीर्घकाळ औषधोपचार घ्यावे लागतात. करोडो ...
नगर सह्याद्री टीम
कॅन्सर अर्थात कर्करोग या आजाराला सर्वच भितात. कारण हा एक जीवघेणा आजरा आहे. याला दीर्घकाळ औषधोपचार घ्यावे लागतात. करोडो लोकांना यामुळे जीव गमवावा लागतो.
परंतु आता एक चांगली बातमी आली आहे. या रिपोर्टनुसार पण आता शास्त्रज्ञांनी वेगवान उपचार शोधून काढला असून हा उपाय केवळ 7 मिनिटांत कर्करोगाच्या पेशी नष्ट करेल. NHS इंग्लंडने जगातील सर्वात पहिले इंजेक्शन तयार केले आहे,
ज्याचा वापर करून अनेक प्रकारच्या कॅन्सरवर अवघ्या 7 मिनिटांत उपचार करता येतील. एनएचएस इंग्लंडने नोंदवले की हे इंजेक्शन Atezolizumab इम्युनोथेरेपी औषधाच्या जागी वापरले जाईल. ज्याचा उपयोग फुफ्फुस, ब्रेस्ट, लिव्हर आणि किडनी या सर्व प्रकारच्या कॅन्सरमधून बरं होण्यासाठी केला जाऊ शकतो.
आतापर्यंत जरा वेगळी स्थित होती. हे औषध देण्यासाठी 30 मिनिटे ते 60 मिनिटे लागायची. याचे कारण असे होते की, योग्य नस सापडणं गरजेचं असायचं. अन ही नस शोधायला खूप वेळ लागत असे. परंतु आता हे नवीन इंजेक्शन अंडर द स्किन असणार आहे. ज्याला फक्त 7 मिनिटे लागतील.
COMMENTS