छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री नुकतीच तलाठी भरती प्रक्रिया पार पडली. परंतु आता तलाठी परीक्षेदरम्यानचा छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेला धक्...
छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री
नुकतीच तलाठी भरती प्रक्रिया पार पडली. परंतु आता तलाठी परीक्षेदरम्यानचा छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला. या परीक्षेदरम्यान, परीक्षा केंद्रातील कर्मचारी आणि इतर काही जणांनी मिळून परीक्षार्थींना उत्तरं पुरवल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.
परीक्षा घेणाऱ्या एका कंपनीच्या दोन कंत्राटी कामगारांनी हाउसकीपिंगचे काम करणाऱ्या महिलेला पैशाची लालूच देऊन परीक्षा सुरू असताना परीक्षार्थींना कागदावर उत्तरे लिहून देत उमेदवारांना कॉपी पुरवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिकलठाणा येथे आय ऑन परीक्षा केंद्राबाहेरून परीक्षार्थी असलेल्या उमेदवारांना उत्तरे पुरवणाऱ्या राजू भीमराव नागरे याला पोलिसांनी अटक केली होती.
नागरे याच्या मोबाईलमधून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे, यामध्ये परीक्षा केंद्रावर टीसीएस तर्फे कंत्राटी पर्यवेक्षक म्हणून नेमलेल्या दोन कर्मचाऱ्यांसह एका महिलेचा समावेश या रॅकेटमध्ये असल्याचे समोर आले आहे.
यामध्ये शाहरुख युनूस शेख (वय २७ रा. वैजापूर) पवन सुरेश शिरसाट (वय २६ राहणार सिडको) बाली रमेश हिवराळे (वय ३० रा. ब्रिज वाडी) या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर विकी रोहिदास सोनवणे (वय ३० रा. चौका) याच्या नावावर सिम कार्ड असलेल्या आरोपीला अटक केली आहे.
COMMENTS