अहमदनगर / नगर सह्याद्री स्थानिक गुन्हे शाखेने दोन सराईत गुन्हेगार ताब्यात घेतले आहेत. लहू काळे व विनोद पिंपळे दोन्ही रा. नाशिक असे आरोपींचे...
अहमदनगर / नगर सह्याद्री
स्थानिक गुन्हे शाखेने दोन सराईत गुन्हेगार ताब्यात घेतले आहेत. लहू काळे व विनोद पिंपळे दोन्ही रा. नाशिक असे आरोपींचे नाव आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 10 तोळे सोने जप्त केले आहे.
समजलेली अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी प्रिया मुंकूद झंवर (वय 35, रा. छायानगर, रेल्वे स्टेशन, अहमदनगर) या त्यांच्या मुलासोबत मोटार सायकलवर जाताना दोन अनोळखी इसमांनी त्याच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून नेले होते.
त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली होती. चैन स्नॅचिंगचे गुन्हे घडल्यानंतर पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून चैन स्नॅचिंग गुन्ह्यांचा समांतर तपास करुन गुन्हे उघडकिस आणण्याबाबत आदेशित केले होते.
या आदेशान्वये कार्यवाही करत असताना पोनि दिनेश आहेर यांना गुप्तबातमी मिळाली की, चैन स्नॅचिंग चोरी करणारे लहु काळे व विनोद पिंपळे (दोन्ही रा. नाशिक) असे दोघे नगर मनमाड रोडने अहमदनगरच्या दिशेने चोरीचे सोने विक्री करण्यासाठी येणार आहेत.
त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी अहमदनगर, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, नाशिक व नवी मुंबई परिसरात जबरी चोरी व चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
COMMENTS