महापालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष लोखंडे यांची आमदारांकडे तक्रार अहमदनगर | नगर सह्याद्री महापालिकेतील मानधन तत्वावरील अभियंते व कर्मचार्यां...
महापालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष लोखंडे यांची आमदारांकडे तक्रार
महापालिकेतील मानधन तत्वावरील अभियंते व कर्मचार्यांना कायम करण्यासाठी एका कर्मचार्यामार्फत ५ ते १० लाख रुपये गोळा केले जात आहेत. मनपामध्ये कायम कराण्याचा ठराव करायचा असेल तर पैसे द्यावे लागतील, असे सांगून हे पैसे गोळा केले जात असल्याची गंभीर तक्रार मनपा कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी आमदार संग्राम जगताप यांना निवेदन देऊन केली आहे.
यासंदर्भात मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडेही तक्रार करणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितले. मनपा कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांची निवेदन आमदार जगताप यांना देण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही गंभीर तक्रार केली. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, संघटनेचे पदाधिकारी आनंद वायकर, बाबासाहेब मुदगल, सतीश ताठे, परिमल निकम, विकास गीते, बलराज गायकवाड, गुलाब गाडे, महादेव कोतकर, बाबासाहेब राशिनकर, विठ्ठल उमाप, राहुल साबळे, अमोल लहारे, अजित तारू आदी उपस्थित होते.
संघटनेच्या वतीने २ ऑटोबरला नगर ते मंत्रालय असा पायी ’लाँगमार्च’ काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रात ड वर्ग महापालिका कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. इतर मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही तेथे तो लागू केला. मात्र नगर मनपा कर्मचार्यांना तो लागू झाला नाही. त्यामुळे सातवा वेतन आयोग लागू करावा, सफाई कर्मचार्यांना वारसांना नोकरी हक्क मिळावा या मागणीचे निवेदन संघटनेने आमदार जगताप यांना दिले.
COMMENTS