यवतमाळ। नगर सहयाद्री- यवतमाळ जिल्ह्यातून एक दुर्देवी घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. तालुक्यातील दाभडी येथे विजेचा शॉकलागल्याने मायलेकराच...
यवतमाळ। नगर सहयाद्री-
यवतमाळ जिल्ह्यातून एक दुर्देवी घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. तालुक्यातील दाभडी येथे विजेचा शॉकलागल्याने मायलेकराचा मृत्य झाल्याची घटना घडली आहे. कुणाल राठोड आणि वनिता सुनिल राठोड अशी मृत मायलेकांची नावे आहेत. राठोड कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, दाभाडी गावात राठोड कुटूंब वास्तव्यास आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे उन्हाच्या झळा जाणवत आहे. उकाड्यापासून दिलासा मिळावाण्यासाठी राठोड कटूंबीयांनी घरात कुलर लावला होता. त्या कुलरमध्ये विजेचा प्रवाह उतरला होता.
चिमुकला कुणाल खेळण्याचा नादात होता. खेळता-खेळता त्याचा हात कुलरला लागताच विजेचा जोरदार धक्का बसला. त्याला पहाताच आई वनिताने त्याच्याकडे धाव घेतली. चिमुकल्याला वाचवण्याच्या नादात वनितालाही विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेत दोघा मायलेकराचा जागीच मृत्यु झाला. या घटने घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
COMMENTS