दरम्यान २२ ऑगस्टला तरुणी कॉलेजला गेल्यावर आरोपी तिथे येऊन मुलीला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
अमरावती । नगर सह्याद्री
एका अल्पवयीन मुलीला काॅलेजच्या कॅंटिनसमोर उभी असताना एका तरुणाने तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दर्यापूर येथील एका कनिष्ट महाविद्यालयात २२ ऑगस्टला दुपारी दीडच्या दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी पिडिताच्या आईच्या तक्रारीवरून दर्यापूर पोलिस ठाण्यात आरोपी श्रेयस तायडे याच्या विरोधात मारहाण व पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन मुलीचे व आरोपी श्रेयसचे एक वर्षापूर्वी प्रेम संबंध होते. मुलीच्या कुटुंबियांना माहिती झाल्याने आईवडिलांनी तिच्यासह आरोपीला देखील समजावून सांगितले. तेव्हापासून मुलगी आरोपीसोबत बोलत नव्हती. त्यानंतर आरोपीने मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली. मुलगी हतबल झाल्याने त्याला टाळण्यासाठी रस्ता बदलायची.
दरम्यान २२ ऑगस्टला तरुणी कॉलेजला गेल्यावर आरोपीने तिथे येऊन मुलीला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. माराने ती खाली कोसळल्याने घटनस्थळी शिक्षकांनी धाव घेतली. मुलगी जखमी झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेहून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS