खून केल्यानंतर त्याचे प्रेत साडीत गुंडाळून व पुरावा नष्ट करण्यासाठी दुचाकी गाडीवर नेऊन पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर घाटामध्ये फेकून दिले.
पुणे । नगर सह्याद्री
मोडलिंब येथे राहणाऱ्या आई आणि तिच्या प्रियकराच्या प्रेमात अडथळा येत असल्याने पोटाच्या मुलाचं आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चार वर्षाच्या चुटक्या नावाच्या चिमुरड्याचा गळा दाबून खून आईने खून करून मुलाचा मृतदेह माळशिरसजवळील घाटात फेकून दिला.
खून झालेल्या चार वर्षीय मुलाचे नाव चुटक्या शंकर पवार असून त्याची आई रेणू शंकर पवार व तिचा प्रियकर उमेश अरुण साळुंके या दोघांना जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे. रेणू पवार हिच्या चुलत बहिणीने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मोडलिंब येथे राहणारे रेणू पवार आणि उमेश साळुंके यांचे प्रेमसंबंध असल्याने या प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षाच्या चुटक्या या मुलाचा दोघांनी दीड महिन्यांपूर्वी गळा दाबून खून केला.
खून केल्यानंतर त्याचे प्रेत साडीत गुंडाळून व पुरावा नष्ट करण्यासाठी दुचाकी गाडीवर नेऊन पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर घाटामध्ये फेकून दिले. या प्रकरणाची तक्रार रेणू पवार हिच्या चुलत बहिणीने पोलीस स्टेशनला दिल्याने घाटात फेकून दिलेल्या चिमुकल्याच्या प्रेताचे अवशेष शोधून काढून आरोपीला अटक केले.
COMMENTS