जगताप यांच्या पत्नीने आरडाओरड केला परंतु रात्रीच्या वेळी रस्त्यावर कुणीही नसल्यामुळे मदत मिळू शकली नाही.
हिंगोली । नगर सह्याद्री
धोंडे जेवणाहून परतणाऱ्या दाम्पत्याची दुचाकी अडवून त्याच्याकडून दागिने लुटल्याची घटना समोर आली आहे. घडलेला प्रकार खंडाळा शिवारात ६ ऑगस्ट रोजी रात्री ९ च्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी चोरटयांनी महिलेच्या अंगावरील सुमारे दीड लाखांच्या दागिन्यांसह मोबाइल लंपास केला आहे.
निवृत्ती नामदेव जगताप त्यांची पत्नी व तीन वर्षाची मुलगी ६ ऑगस्ट रोजी माळसेलू येथे धोंडे जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यनंतर ते आपल्या गावी निघाले असता खंडाळा शिवारात त्याची तिघाजणांनी दुचाकी अडवून त्याला धमकाविले व जगताप यांच्या खिशातील मोबाइल हिसकावून घेतला.
पत्नीच्या अंगावर असलेले दागिने काढून पळून गेले. जगताप यांच्या पत्नीने आरडाओरड केला परंतु रात्रीच्या वेळी रस्त्यावर कुणीही नसल्यामुळे मदत मिळू शकली नाही. चोरट्यांनी सुमारे दीड लाख रूपयांचे दागिने व मोबाइलला लुटल्याची माहिती जगताप यांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच भांडेगाव, साटंबा, खंडाळा भागातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
COMMENTS