डॉ. सुजय विखे पाटील यांनी महिला बचत गटांना पाठबळ देत हजारो कुटुंबांना उपयोगी साहित्य देउन महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात पाठबळ दिले
सचिन वराळ पाटील | शिवांजली व ओवी महिला बचत गट विक्री केंद्राचे वितरण
निघोज | नगर सह्याद्री
राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महिला बचत गटांना पाठबळ देत हजारो कुटुंबांना उपयोगी साहित्य देउन महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात पाठबळ दिले असल्याचे प्रतिपादन संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ पाटील यांनी व्यक्त केले आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा नियोजन समिती अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने अळकुटी येथील शिवांजली व ओवी महिला स्वयंसहायता बचत गटास स्वयंरोजगारासाठी विक्री केंद्राचे वितरण करण्यात आले. या केंद्राचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्या लताताई घोलप होत्या.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ कोरडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा बडवे, वडनेर गावचे माजी सरपंच स्वाती नर्हे, भाजपचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष मनोहर राउत, भाजपचे तालुका उपाध्यक्ष मोहन खराडे, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, नवनाथ सालके, अळकुटी माजी उपसरपंच शरद घोलप, ग्रा. पं . सदस्या मीराताई शिरोळे, किसन शिंदे, अतुल माने, राहुल नरड, महेंद्र शिरोळे, नाना शिरोळे, गोरख घोलप, नितीन घोलप, रवींद्र वाघ, बबन शिरोळे, विक्रांत काजळे, बाबुराव शिरोळे. निवृत्ती शिंदे, पांडुरंग उघडे, शिवांजली व ओवी महिला गटात महिला गटाचे अध्यक्ष, श्रीमंती श्वेता वाघ, अनिता ढूमणे, चंद्रभागा वाघ, माधुरी भालेकर, सुनिता जाधव, अस्मिता मते, सुरेखा खेडकर, उज्वला ढूमणे, कोमल खेडकर, भाग्यश्री पारखे, हिना शेख, विमल घोलप, सुरेखा घोलप, मंगल शिंदे, तनुजा घोलप, शितल घोलप, मंदा घोलप, सुरेखा शिंदे कांचन घोलप, सिंधू घोलप, अंगणवाडी सेविका कल्पना घोलप, सुरेखा रामदास घोलप, वैशाली घोलप, सोनाली घोलप, संगीता परंडवाल, सुरेखा पवार, महिला गटाच्या सर्व सदस्या आळकुटी येथील सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
वराळ पाटील यावेळी म्हणाले पारनेर तालुयातील महिला बचत गटांना विखे पाटील यांनी मोठे सहकार्य करुन पाठबळ दिले आहे. विविध शासकीय योजना सरकारच्या माध्यमातून सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेड्यातील कुटुंब स्वयंपूर्ण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात योजना राबवल्या आहेत. महिला बचत गट स्वयंपूर्ण होण्यासाठी सरकारचे मोठे योगदान असून विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यातील महिला गटांना सक्षम करण्यासाठी पाठबळ दिले असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले आहे.
COMMENTS