याप्रकरणी राम सुभाष श्रीराम (२५), गोपाल ज्ञानोबा कोटालापुरे (२५) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे। नगर सह्याद्री
दारु पिताना झालेल्या वादातून दोन तरुणाची तीक्ष्ण शस्त्राने खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घडलेला प्रकार नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडला. शैलेश मांडगीकर (२६) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राम सुभाष श्रीराम (२५), गोपाल ज्ञानोबा कोटालापुरे (२५) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगम चंद्रशेखर धारिया (२३) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. कोटलापूरे, धारिया, श्रीराम आणि मांडगीकर हे चौघेही कामगार असून बुधवारी रात्री वाघोली-केसनंद रस्त्यावरील सिट्रोन सोसायटीसमोर दारु पित होते. ठेकेदाराने मांडगीकरला श्रीरामच्या सांगण्यावरुन कामावरुन काढल्याने त्यांच्यामध्ये वाद झाला. मांडगीकरने दारूच्या नशेत श्रीराम आणि कोटलापुरे यांना शिवीगाळ कारण्यात आली.
वाद टोकाला गेल्याने दोघांनी मांडगीकरवर तीक्ष्ण शस्त्राने वार करत त्याचा खून केला. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत्यू तरुणाचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. पसार झालेल्या आराेपींचा पोलिस शोध सहायक पोलिस निरीक्षक एम. के. पाटील घेत आहेत.
COMMENTS