अभिनेता अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी चर्चेत असते. ट्विंकल तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत राहते.
मुंबई / नगर सह्याद्री -
मुंबई | अभिनेता अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी चर्चेत असते. ट्विंकल तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत राहते. ट्विंकल एक लोकप्रिय लेखिका देखील आहे. तिची पुस्तक आणि तिच्या मुलाखती नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. ट्विंकलनं अनेक मॅग्झिनसाठी कॉलम्स लिहिले आहेत. त्यापैकी एका कॉलममध्ये ट्विंकलनं तिची आई डिंपल कपाडिया यांच्याविषयी असं काही लिहिलं की सगळ्यांना आश्चर्य वाटले. तिनं म्हटलं होतं की तिला आई डिंपलचा गळा दाबण्याची इच्छा झाली होती.
ट्विंकलनं या कॉलममध्ये तिच्या खासगी आयुष्याविषयी लिहितं सगळ्यांचे लक्ष वेधले. ट्विंकलनं खुलासा केला होता की वडील राजेश खन्ना यांच्या निधनानंतर ती आई डिंपल यांच्या खूप जवळ आली होती. पण असं काही झालं की ट्विंकलला आईचा इतका राग आला की ती स्वत: ला थांबवू शकत नव्हती. याचा खुलासा करत ट्विंकल म्हणते, त्यावेळी तिनं स्वत: ला कसं तरी थांबवल किंवा शांत केलं होतं. एकदा डिंपल यांनी तिच्या केसांच्या हायलाईटवरून कमेंट केली होती. केस पाहून असं वाटतंय की कोणी पान खाऊन थुंकलं आहे.
हे ऐकल्यानंतर ट्विंकलला खूप राग आला. पुढे ट्विंकलनं हे देखील म्हटलं की आईनं हे मस्करीत म्हटलं होतं. पण मला खूप राग आला होता. ट्विंकल तिच्या स्पष्ट मतांसाठी ओळखली जाते. तिला जे वाटेल ते ती बोलून जाते. याविषयी पती अक्षय कुमारनं देखील ट्विंकल कधी काय पोस्ट करेल याची भीती वाटते, असे म्हटले होते.
COMMENTS