नंदुरबार जिल्ह्यातून अपघाताची बातमी समोर आली आहे. भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली.
मुंबई / नगर सह्याद्री -
नंदुरबार जिल्ह्यातून अपघाताची बातमी समोर आली आहे. भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यानंतर ट्रकचालकाने दुचाकीस्वाराला दूरपर्यंत फरफटत नेले. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील नंदुरबार रोडवर आज सकाळी हा अपघात झाला. शहादा नंदुरबार रोडवर झालेल्या अपघातात भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले. यामध्ये शहादा येथील मुसेब तेली या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. एका व्यक्तीची प्रकृती गंभीर झाल्याची घटना समोर आली आहे. अपघातानंतर परिसरात नागरिकांची गर्दी झाली. यानंतर जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर ट्रकचालक ट्रकसह पळून गेला. मात्र, पोलिसांनी सुमारे ६०किलोमीटर पाठलाग करून ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
COMMENTS