घडलेला प्रकार समोर आल्यानंतर अविनाश माने आणि शीतल माने या दोघांनाही अटक दादर जीआरपीकडे सोपवण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई । नगर सह्याद्री
मुंबईतल्या सायन स्टेशनवरून शीतल माने आणि त्यांचे पती अविनाश माने हे दोघंही मानखुर्दला जाण्यासाठी निघाले असताना शीतलला एका माणसाचा धक्का लागला. त्यानंतर त्यांनी त्या व्यक्तीला छत्रीने मारण्यास सुरुवात केली व पती अविनाश यांनीही त्याला जोरदार ठोसा लगावला. त्यामुळे हा व्यक्ती रेल्वे रुळावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला. घडलेली घटना रविवारी रात्री ९.१५ दरम्यान घडली.
याप्रकरणी दादर जीआरपीने अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. त्यानंतर घडलेला प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झाल्याने उघकीस आला. जीआरपी गुन्हे शाखेद्वारे या प्रकरणाची चौकशी करण्यात आल्यानंतर समोर आले की, ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्या व्यक्तीचं नाव दिनेश राठोड असे आहे.
घडलेला प्रकार समोर आल्यानंतर अविनाश माने आणि शीतल माने या दोघांनाही अटक दादर जीआरपीकडे सोपवण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. भारतीय दंड संहिता कलम ३०४ (२), कलम ३४ च्या अंतर्गत या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS